जळगाव प्रतिनिधी । आज सायंकाळी आलेल्या रिपोर्टमध्ये जिल्ह्यात ५६ नवीन कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण आढळून आले असून यात भुसावळ, जामनेर व धरणगावात संसर्ग वाढीस लागल्याचे दिसून आले आहे.
जिल्हा माहिती कार्यालयाने आज सायंकाळी कोरोना बाधीतांची माहिती एका प्रेस नोटच्या माध्यमातून जाहीर केली आहे. यात सर्वाधीक १९ रूग्ण हे भुसावळचे असून याच्या खालोखाल जामनेर येथील १३ रूग्ण आहेत. उर्वरित जिल्ह्याचा विचार केला असता जळगाव शहर-४; चोपडा-३; धरणगाव-९; यावल-५; रावेर-१; पारोळा-२ या रूग्णांचा समावेश आहे. यामुळे आता जिल्ह्यात एकूण कोरोना पॉझिटीव्ह ११६५ असून असल्याचे या प्रेस नोटमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. जिल्ह्यात १२२ रूग्णांचा मृत्यू झाला असून ५३० रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे.