जळगाव प्रतिनिधी । आज जिल्ह्यात १३० कोरोना बाधीत रूग्ण आढळून आले असून यामुळे सलग तिसर्या दिवशी रूग्ण संख्येने शंभरी गाठली असून या विषाणूचा संसर्ग मोठ्या गतीने होत असल्याचे दिसून आले आहे.
जिल्हा माहिती कार्यालयाने आज सायंकाळी एका प्रेस नोटच्या माध्यमातून कोरोनोच्या रिपोर्टबाबतची माहिती अपडेट केली आहे. यानुसार आज जिल्ह्यात एकूण १३० नवीन कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण आढळून आले आहेत. यात सर्वाधीक २२ रूग्ण धरणगाव शहरातील असल्याचे स्पष्ट झाले आहे. याच्या सोबत रावेर-२१; जळगाव-२०; जामनेर-१८; चोपडा, जळगाव ग्रामीण व भुसावळ प्रत्येकी पाच; भडगाव व यावल प्रत्येकी २; पाचोरा-३; पारोळा-९; बोदवड-४; एरंडोल १ असे रूग्ण आढळून आले आहेत.
दरम्यान, आज लागोपाठ तिसर्या दिवशी कोरोना बाधीतांची संख्या शंभरच्या वर गेल्याने आता या विषाणूचा संसर्ग मोठ्या प्रमाणात होऊ लागल्याचे अधोरेखीत झाले आहे. दरम्यान, आजचे रिपोर्ट आल्यानंतर जिल्ह्यातील कोरोना बाधीतांची संख्या १५२६ इतकी झाली आहे. यात जळगाव आणि भुसावळ तालुक्यांमध्ये सर्वाधीक समान २८० कोरोना बाधीत असून याच्या खालोखाल अमळनेरात २१६ व रावेरात १०९ रूग्ण असल्याचे दिसून आले आहे.