आज प्रत्येकजण आंदोलन करतय, कुणीही सुखी नाही : मोहन भागवत

mohan bhagvat

 

अहमदाबाद (वृत्तसंस्था) जग इतके जवळ आले की, जवळ येत असताना दोन महायुद्ध झाले, आता तिसरे महायुद्ध होण्याची भीती निर्माण झाली आहे. सध्या एका वेगळ्या प्रकारचे तिसरे महायुद्ध सुरू आहे, ज्यात प्रत्येक ठिकाणी मारहाण सुरू आहे. कोन सुखी आहे? कोणीच नाही. प्रत्येकजण आंदोलन करत आहे. मील मालक, मजुर, सरकार, जनता, विद्यार्थी, शिक्षक, सर्वजण आंदोलन करत आहेत. सर्वजण दुखी, असंतुष्ट आहेत आणि त्यांच्यात मोठा कलह सुरू असल्याचे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ(आरएसएस) प्रमुख मोहन भागवत व्यक्त केले आहे. ते अहमदाबादमधील एका कार्यक्रमात बोलत होते.

 

मोहन भागवत यांनी समाजात वाढत असलेल्या हिंसा आणि असंतुष्टीवर चिंता व्यक्त केली आहे. भागवत म्हणाले की, तिसऱ्या महायुद्धाची भीती वाढत आहे. मील मालक, मजुर, सरकार, जनता, विद्यार्थी आणि शिक्षक सर्वजण आंदोलने करत आहेत. संघ प्रमुख पुढे म्हणालेकी, ‘‘जग इतके जवळ आले की, जवळ येत असताना दोन महायुद्ध झाले, आता तिसरे महायुद्ध होण्याची भीती निर्माण झाली आहे. विज्ञानाने खूप प्रगती केली, पण हिंसा आणि कट्टरवाद कमी झाला नाही. संकट कमी होण्याऐवजी वाढत आहे.

Protected Content