जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील शिरसोली येथील साठ वर्षीय वृध्दाने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केलीय आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
अधिक माहिती अशी की, तालुक्यातील शिरसोली प्र.न. गावातील इंदीरा नगरात राहणारे दत्तू भानूदास मराठे (वय-६०) हे पत्नी केवलबाई यांच्यासोबत हातमजूरी करून आपला उदरनिर्वाह करतात. गावात त्यांचे दोन मजली इमारत आहे. आज सकाळी पत्नी खालच्या घरात काम करत होत्या. जेवण झाल्यानंतर ते वरच्या खोलीत गेले. सकाळी ११.३० ते ११.४५ वाजेच्या दरम्यान दरवाजा आतून बंद करून दोरीने गळफास घेवून आत्महत्या केली. पत्नी केवलबाई वरच्या खोलीत गेल्यावर हा प्रकार लक्षात आला. पोलीस पाटील श्रीकृष्ण बारी यांच्या खबरीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. दरम्यान, ते काही दिवसांपासून आजारी होते. अशी माहिती पोलीस पाटील श्रीकृष्ण बारी यांनी सांगितले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले असा परिवार आहे.