आजपासून ब्रेक द चैन नियमांची कठोर अंमलबजावणी,शेंदूर्णी शांतता कमिटीचा निर्णय

 

 

 

 

 शेंदूर्णी : प्रतिनिधी । येथील पोलीस दूरक्षेत्र कार्यालयात  ६ एप्रिलरोजी कोविड १९ नियमावली व अंमलबजावणीवर शांतता कमिटी बैठकीचे आयोजन पहुरचे पोलीस निरीक्षक राहुल खताळ यांचे अध्यक्षतेखाली करण्यात आले होते  नियमांच्या कठोर अंमलबजावणीचा निर्णय यावेळी घेण्यात आला

 

राज्य सरकारने कोरोना संसर्ग रोखण्यासाठी नवीन नियमावली ब्रेक द चैन लागू केली आहे त्याची अंमलबजावणी शेंदूर्णी येथे सक्तीने करण्यात यावी त्यासाठी पोलीस प्रशासन व नगरपंचायत यांनी संयुक्त कृती  करण्यास  गावकऱ्यांनी संपूर्ण पाठिंबा जाहीर केला  पोलीस प्रशासन रात्री  ८ ते सकाळी ७ संचारबंदी ,शनिवार व  रविवार १०० टक्के  लॉक डाउन व  ५ ते ३० एप्रिल या  काळात दिवसा कलम १४४ नुसार पाच पेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यावर बंदी  ,  लग्न समारंभ व अंत्यविधीसाठी २० लोकांचीच उपस्थिती बंधनकारक करण्यात आली असल्याची माहिती पो  नि  राहुल खताळ यांनी दिली

 

या  नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यासाठी पोलीस प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले  शांतता कमिटी सदस्यांनी पोलीस प्रशासनास नियमांची कठोर अंमलबजावणी करण्यासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले शांतता कमिटी सभेत माजी उपसरपंच पंडितराव जोहरे, गोविंद अग्रवाल, माजी ग्रामपंचायत सदस्य अमृत खलसे, गरुड महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.वासुदेव पाटील , सर्व दैनिकाचे पत्रकार, नगरसेवक व लोकप्रतिनिधी उपस्थित होते,

 

कोरोना १९ नवीन नियमावली नुसार अत्यावश्यक सेवा,  मेडिकल, दवाखाने, दूध डेअरी, किराणा दुकान यांनाच परवानगी असून दैनंदिन भाजीपाला विक्री   आठवडे बाजाराचे जागेवरच करता येणार आहे   दर बुधवारी आठवडे बाजार बंद राहील असे सांगण्यात आले आहे. अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने बंद राहतील याची नागरिकांनी नोंद घ्यावी व प्रशासनास सहकार्य करावे असे कळकळीचे आवाहन शांतता कमिटीचे वतीने करण्यात आले

 

. शासनाच्या   निर्देशानुसार सोशल डिस्टन्स नियमाचे पालन सभेत करण्यात आले  स्थानिक पातळीवर कोरोना १९ नियमावली अंमलबजावणीची जबाबदारी असलेल्या शेंदूर्णी नगरपंचायतचे एकही जबाबदार अधिकारी व कर्मचारी सभेस उपस्थित नसल्याने नियमाची अंमलबजावणीची  जबाबदारी एकट्या पोलीस खात्याचीच आहे का असा प्रश्न सभेतील नागरिकांनी उपस्थित केला नगरपंचायत प्रशासनाची शांतता कमिटी सभेत  उपस्थित राहण्यास अनुत्सुकता दिसून आल्याने नियमांची अंमलबजावणी करणार कोण असा सवाल सभेत नागरिकांनी केला .

Protected Content