जळगाव प्रतिनिधी । अनोळखी मुलीच्या सोबत आक्षेपार्ह व्हिडीओत तरूण असल्याचे भासवून त्या तरूणाला साडेसात हजार रूपयांची खंडणी ऑनलाईन मागितल्याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, प्रशांत नाना बाविस्कर (वय-३१) रा. गणेश कॉलनी यांना त्यांच्या फेसबुक पेजवर निशा शर्मा नावाच्या फेसबुक पेजवरून ११ फेब्रुवारी रोजी ११ वाजता फेन्ड रिक्वेस्ट आली. प्रशात बाविस्कर यांनी ती ॲक्सेप्ट केली. त्यानंतर त्या पेजवरून स्क्रिनवर एका आक्षेपार्ह विडिओ पाठविला होता. तो व्हिडीओ प्रशांत हे पाहत असल्याचे भासविल्याचा व्हिडीओ पाठविला होता. वरील बनावट अकाऊंटच्या मोबाईल नंबरवरून प्रशांत बाविस्कर यांच्या व्हॉटसॲपवर पाठविला. दरम्यान या व्हिडीओत आपण असल्याचे भासवून प्रशांत यांच्याकडून खंडणी मागितली. घाबरून प्रशांत बाविस्कर यांनी संबंधित अनोळखी व्यक्तीच्या पे-फोनवर ७ हजार ४९९ रूपये ऑनलाईन पाठविले. दरम्यान आपली फसवणूक होत असल्याने त्यांनी रितसर जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक विलास शेंडे करीत आहे.