नाशिक (वृत्तसंस्था) बाप आईला बॅटने मारहाण करताना मुलाच्या वर्मी फटका बसल्याने त्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना नाशकात घडली आहे.
या संदर्भात अधिक असे की, आर्यन या चिमुरड्याची आईच्या चारित्र्याच्या संशयावरून पतीसोबत वाद सुरु झाला. या वादाचे स्वरुप हाणामारीत झाली. आर्यनचे वडील भीमराव यांनी जवळच असलेल्या बॅटने आईला मारहाण केली. यातच आर्यन रडू लागल्याने वडील भीमराव याने आर्यनलाही मारहाण सुरू केली. आर्यनच्या डोक्यात बॅट लागल्याने आर्यन गंभीर जखमी झाला. आर्यनला तातडीने जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केले होते. मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला मुंबईला जे जे रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. मात्र उपचारा दरम्यान आर्यनचा मृत्यू झाला.