आंबे वडगाव परिसरात विविध विकासकामांचे आमदार पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन

 

पाचोरा, प्रतिनिधी । तालुक्यातील आंबे वडगाव ते डांभुर्णी (ग्रा.मा. ४१) रस्त्याचे व आंबे वडगांव ते कुऱ्हाड (ग्रा. मा. ४१) रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण कामांचे भूमिपूजन आ. किशोर पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

महाराष्ट्र शासन जिल्हा परिषद बांधकाम यांच्या माध्यमातून व जिल्हा परिषद सदस्या रेखा दिपकसिंग राजपुत यांच्या प्रयत्नांनी तालुक्यातील आंबे वडगांव ते डांभुर्णी (ग्रा.मा. ४१) रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण या कामासाठी ४८ लाख रुपये निधी तसेच आंबे वडगांव ते कुऱ्हाड (ग्रा. मा. ४१) रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण यासाठी १८ लाख रुपये निधी मंजूर झाला असून या कामांचे भुमिपुजन आमदार किशोर पाटील यांचे हस्ते नुकतेच करण्यात आले आहे. याप्रसंगी जि. प. सदस्या रेखा दिपकसिंग राजपुत, माजी जि. प. सदस्य दिपकसिंग राजपुत, शेतकरी सेनेचे जिल्हा प्रमुख अरुण पाटील, गणेश पाटील, अॅड. मंगेश गायकवाड, डॉ. शामकांत पाटील, उत्तम राठोड, हेमराज राठोड, चरणसिंग राठोड, धनराज राठोड, उदल चव्हाण, शाम राठोड, विनोद राठोड, दत्तु राठोड, विपुल राठोड, कुलदिप जाधव, राजु राठोड, समाधान पवार, शिवदास जाधव, बसराज पवार, गोकुळ चव्हाण, रंगलाल चव्हाण, दिनकर चव्हाण, विनायक शेळके, उपसरपंच हमिदाबाई तडवी, सरला निकम, मच्छिंद्र थोरात, अमरसिंग पवार, प्रदिप सानप, ग्रामसेवक नारायण सोनवणे, बालु चंद्रे, संजय देवरे, शशिकांत वाघ, मंगेश खैरनार, भोला शेळके, आण्णा चव्हाण, कैलास निकम, नाना शिंदे, राजेंद्र भुसारे, गजानन चंद्रे यांचेसह पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थितांना सॅनीटायझर व मास्क वाटप करण्यात आले.

Protected Content