नवी दिल्ली । देशात बुध्दीजीवी आणि श्रमजीवी यांच्या प्रमाणेच आता आंदोलनजीवी म्हणून नवीन जमात जन्माला आली असून त्यांच्या पासून देशवासियांनी सावध राहण्याचा सल्ला पंतप्रधान मोदी यांनी दिला. आज राज्यसभेत कृषी कायद्यांबाबत भाष्य करतांना पंतप्रधानांनी याला विरोध करणार्यांवर जोरदार हल्लाबोल केला.
पंतप्रधान मोदी यांनी आज कृषी कायद्यांवरून भाषण केले. मोदी यांनी आज संसदेत भाषण करताना देशात आंदोलनाच्या नावाखाली गोंधळ घालणाऱ्यांवर जोरदार टीका केली. आपण या पूर्वी श्रमजीवी, बुद्धिजीवी हे शब्द ऐकले होते. आता आंदोलनजीवी नावाची जमात निर्माण झाली आहे. ही टोळी देशभरात सक्रिय असून या टोळीने उपद्रव निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.
ते म्हणाले की, देशात काही ठिकाणी आंदोलकांची एक टोळी निर्माण झाल्याचंही त्यांनी सांगितलं. काही बुद्धिजीवी असतात. काही श्रमजीवी असतात. परंतु मागच्या काही काळात आंदोलनजीवी पाहायला मिळत आहेत. देशात कुठेही काहीही झाले तर हे आंदोलनजीवी सर्वात आधी तिथे असतात. कधी पडद्याच्या मागे असतात तर पडद्या पुढे असतात. अशा लोकांना ओळखून आपल्याला त्यांच्यापासून सावध राहिलं पाहिजे. हे लोक स्वत: आंदोलन करत नाहीत. त्यांची ती क्षमताही नाही. मात्र, एखादं आंदोलन सुरू असेल तर हे लोक तिथे पोहोचतात. हे आंदोलनजीवी परजीवी आहेत. ते प्रत्येक ठिकाणी मिळतात.
तुमचेही अनेक राज्यात सरकार असेल. तुम्हीही सरकार चालवत असाल. त्यावेळी तुम्हालाही या आंदोलनजीवींचा अनुभव आला असेल. त्यांचा त्रासही जाणवला असेल, असंही ते म्हणाले. आता देशात एक नवा एफडीआय आला आहे. त्याला म्हणतात. त्यापासून देशाला वाचवणं गरजेचं आहे, असं सांगतानाच आत्मनिर्भर भारत हा कोणत्या सरकारची नव्हे तर देशाची मोहीम आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.