आंतर पिकांची सातबारा उताऱ्यावर नोंद नसल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या

रावेर प्रतिनिधी । शेतकऱ्यांचे आंतर पिकांची सातबारावर नोंदणी होत नसल्याने शेतकऱ्‍यांना प्रचंड आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. आंतर पिकांच्या माध्यमातून घेतलेले उत्पादन शेती उताऱ्‍यावर पिक पेऱ्‍याची नोंद नसल्याने शासनाला हमिभावामध्ये धान्य विक्री करण्यास अडचण निर्माण होत आहे.

शेतक-यांना शेतीच्या माध्यमातून आर्थिक सुभता यावी म्हणून जास्तीत-जास्त आंतर पिके घेण्यासाठी शासनान प्रोत्साहन करत असतात.रावेर तालुक्यात देखील मोठ्या प्रमाणात केळी लागवड केली असेल तर आतंर पिक म्हणून मका गहु हरभरा घेतला जातो.परंतु या आंतर पिकांचा पेरा संबधित शेतकऱ्‍यांच्या सातबारा उताऱ्यावर केली जात नाही. यामुळे आतंर पिकांच्या माध्यमातून झालेले उत्पादन नोंद नसल्याने शासनाला विकता येत नाही व्यापारी कवडीमोल भावात शेतकऱ्‍यांकडून घेतात याचा आर्थीक भुर्दंड शेतकऱ्‍यांना बसतो. ही आतंर पिक महसूल प्रशासनाने नोंदवावी असा सुर शेतकऱ्यांमधून उमटत आहे.

आंतर पिक महसूल प्रशासनाने नोंदवावी
तालुक्यात बहुतांश शेतकऱ्‍यांच्या ७/१२ वर तलाठी केळीची नोंद करतात परंतु संबधीत शेतकरी आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी रब्बीमध्ये गहु हराभरा व मक्याचे उत्पादन घेतात परंतु उत्पादन आल्यावर शेतकरी शासनाच्या धान्य खरेदी केंद्रावर विक्रीसाठी जातो तेव्हा उता-यावर आंतर पिक नोंदले नसल्याने धान्य खरेदी होत नाही याचा त्याला प्रचंड फटका बसतो महसूल प्रशासनाने आतंर पिक घेणारे सर्व शेतकऱ्‍यांचे पिक पेरे नोंदले पाहीजे.
                                             -डॉ राजेंद्र पाटील, माजी सभापती बाजार समिती, रावेर

तालुक्यात आंतर पिकांचे उत्पादन अधिक
तालुक्यात बरीच केळी बागायत शेती असल्याने बरेच शेतकरी जुनारीत रब्बीचे मका हरभरा गहुचे आंतर पिक घेतात परंतु याची नोंद शेतीच्या उता-यावर नसते तालुक्यात मक्याचे उत्पादन हेक्टरी ८० ते १०० क्विंटल आहे तर हरभ-याचे २५ ते ३० क्विंटल असून एवढे उपन्न शेतक-यांना बाहेर विकावे लागते मी स्वता: बऱ्याच वेळा बाहेर विक्री केले आहे आतंर पिकांची नोंदणी झाली असती तर शासना विकता आला असता परंतु आतंर पिक नोंदले जात नसल्याचा फटका आम्हाला बसतो. शासनाने लवकरात-लवकर आतंर पिक नोंदणी केली पाहिजे.
                                            – गोंडू महाजन, शेतकरी रमजीपूर

आतंर पिक काय आहे हे आम्ही सोप्या भाषेत तुम्हाला समजवण्याचा प्रर्यत्न करतोय. समजा एखाद्या शेतक-यांने एकाच क्षेत्रावर केळी लागवड केली तर तलाठी त्याच्या ७/१२ उता-यावर केळीचा नोंदणी ऑनलाइन करतो परंतु जर याच केळी लागवड मध्ये त्याने मका हराभरा किंवा गहुचे आंतर पिकांचे उत्पादन घेतले तर तलाठी आतंर पिक नोंदवुन घेत नसल्याची ओरड शेतक-यां मधुन आहे याचा फटका शेतक-याला त्याचे उत्पादन घेतलेले धान्य शासनाला विक्री करतांना येतो.हीच आतंर पिक उता-यावर नोंद करण्याची मागणी शेतक-यांची आहे.

Protected Content