आँनलाईन व्यवहार करतांना सावधगिरी बाळगा; पो.नि.प्रतापराव इंगळे यांचे आवाहन

शेंदुर्णी ता.जामनेर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | ‘आजघडीला आपले असंख्य आँनलाईन पद्धतीने होत असून ते करत असतांना नागरिकांनी सावधगिरी बाळगावी.’ असे आवाहन पहूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रतापराव इंगळे यांनी केले.

दैनंदिन व्यवहार कँश लेस होत आहे. मोबाईल, सोशल मिडिया, ए.टी.एम. पे.टी.एम. गुगल पे, नेट बँकिंग व्यवहार करतांना आपली फसवणूक होणार नाही. यासाठी नागरिकांनी सावधगिरी बाळगावी. असे आवाहन पोलीस निरीक्षक श्री. इंगळे यांनी केले आहे.

शेंदुर्णी येथील प्रथम पारितोषिक विजेते श्री.त्रिविक्रम गणेशोत्सव मित्र मंडळ, ओम इंन्फोटेक व पहुर पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आज नागरिकांसाठी सायबर सुरक्षा जनजागृती अभियान आयोजित करण्यात आले होते. यावेळी पोलीस निरीक्षक प्रतापराव इंगळे यांनी नागरिकांना या सायबर गुन्हे, यावर उपाय याबाबत सविस्तर, कायदेशीर माहिती दिली.

यावेळी पं.दिनदयालजी उपाध्याय पतसंस्थेचे चेअरमन अमृत खलसे यांनी सुद्धा मोबाईल, बँकिंग व्यवहार करतांना आपली वैयक्तिक माहिती देऊ नये. असे आवाहन केले. ज्ञानेश जोशी यांनी ‘प्रोजेक्टर सायबर सुरक्षा’ जनजागृती अभियानाची सविस्तर प्रात्यक्षिके सादर करत माहिती दिली.

कार्यक्रमाचे प्रास्तविक अँड. देवेंद्र पारळकर यांनी केले. यावेळी श्रीकांत काबरा, भाजपचे नेते सुनील शिनकर, स्विकृत नगरसेवक अँड. धर्मराज सुर्यवंशी, पत्रकार विलास अहिरे, सहा.पोउनि.शशिकांत पाटील,पोलीस बांधव, मंडळाचे अध्यक्ष पंकज सोनार, उपाध्यक्ष मुकेश पाटील, खजिनदार भूषण मुळे, पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांची उपस्थिती होती. सुत्रसंचालन अँड. देवेंद्र पारळकर तर आभार नयन सोनार यांनी मानले.

Protected Content