भुसावळ प्रतिनिधी । येथील माजी प्रभारी नगराध्यक्ष अनिल चौधरी यांची कन्या अॅड. नंदिनी चौधरी यांना बार काऊन्सील ऑफ महाराष्ट्र व गोवाची सनद मिळाली आहे.
नंदिनी अनिल चौधरी यांनी यांनी मुंबई विद्यापीठात लॉ कॉलेजमधून २०२० मध्ये चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होत एलएलबीची परीक्षा उत्तीर्ण केली. यानंतर आता त्यांना नुकतीच सनद प्राप्त झाली आहे. येत्या काळात एलएलएम ही पदव्युत्तर परीक्षा उत्तीर्ण होण्याचा त्यांचा संकल्प आहे. त्याचप्रमाणे आपले शिक्षण आणि न्यायालयीन कामकाजाच्या अनुभवाच्या बळावर गोरगरीब जनतेसाठी न्यायालयीन खटले लढण्याचे त्यांनी ठरविले आहे.
अॅड. नंदिनी चौधरी यांच्या यशाबद्दल माजी आमदार संतोष चौधरीं, माजी नगराध्यक्ष अनिल चौधरी, कृषि उत्पन्न बाजार समिती सभापती सचिन संतोष चौधरी, धीरज चौधरी यांच्यासह हितचिंतकांनी त्यांचे कौतुक केले आहे.