रावेर प्रतिनिधी । तालुक्यातील अहिरवाडी शेत शिवारात बिबट्याचा मुक्तसंचार वाढल्याने शेतकरी व शेतमजूर यांच्यात भितीचे वातावरण तयार झाले आहे. दरम्यान याच बिबट्याने एका कुत्र्याची शिकार करून फस्त केल्याचे समोर आले आहे. वनविभागाला याबाबत कळविण्यात आले आहे.
सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, तालुक्यातील अहिरवाडी शेत शिवारात गौरव चौधरी यांच्या शेतात काही मजूर काम करत असतांना आज दुपारी २.३० वाजेच्या सुमारास बिबट्या दिसला. यामुळे शेतकरी व शेतमजूर यांच्यात भीतीचे वातावरण तयार झाले आहे. तर परिसरातील ग्रामास्थांमध्ये धडकी भरली आहे. काही अंतरावर याच बिबट्याने कुत्र्याची शिकार करून फस्त केल्याचे दिसून आले होते. यासंदर्भात ग्रामस्थांनी वनविभागाला माहिती कळविली असून वनपाल अतुल तायडे यांच्यासह पथक घटनास्थळी रवाना झाले आहे.