पाचोरा, प्रतिनिधी । अस्मिता फाऊंडेशन अध्यक्षा अस्मिता पाटील यांनी वेब मिडीया असोसिएशन पदाधिकारी व सदस्य पत्रकार बांधव यांना मैत्री दिनाच्या दिल्यात.
वेब मिडीया असोसिएशन मुंबईचे सर्व पदाधिकारी व सदस्य यांची निवड झाल्याबद्दल व मैत्री दिनाचे औचित्य साधून अस्मिता फाऊंडेशनच्या अध्यक्षा प्रा. डॉ. अस्मिता पाटील यांनी सर्व पत्रकार बांधवांना शुभेच्छा दिल्यात. अस्मिता फाऊंडेशनचे कार्यालय असोसिएशनच्या पत्रकारांच्या बैठकीसाठी जेव्हा आवश्यक असेल तेव्हा नक्कीच द्यावे अशी असोसिएशनची मागणी केल्याने विनाविलंब डॉ. अस्मिता पाटील यांनी मागणी मान्य केली.
याप्रसंगी विभागीय अध्यक्ष अजयकुमार जैस्वाल (गर्जा महाराष्ट्र न्युज समुह जळगाव), जिल्हा उपाध्यक्ष – सचिन पाटील (फोकस न्यूज संपादक) कार्यकारणी जेष्ठ सदस्य – योगेश पाटील (झेप इंडिया’चे संपादक),जेष्ठ सदस्य – राजु धनराळे (आर. के. न्यूज ),जिल्हा सचिव- नंदु शेलकर ( लाइव्ह ट्रेंड न्यूज व लोक लाईव्ह), जिल्हा संघटक- एन. एस. भुरे (आरोग्य दुत न्यूज संपादक), जिल्हा समन्वयक – जावेद शेख (स्टार १८ न्यूज ), जिल्हा खजिनदार – भुवनेश दुसाने (फोकस न्यूज कार्यकारी संपादक), तालुका उपाध्यक्ष- बंडु सोनार (तालुका माझा), तालुका उपाध्यक्ष- दिपक गढरी (सी.एन. आय. महाराष्ट्र प्रतिनिधी) तालुका सचिव- संजय पाटील (झेप इंडिया’चे प्रतिनिधी), तालुका सरचिटणीस- दिलीप परदेशी (झुम मराठी न्यूज संपादक), तालुका समन्वयक- प्रमोद बारी (जनलक्ष न्यूज संपादक), तालुका सल्लागार – दिलीप पाटील (ट्रेन लाइव्ह न्यूज संपादक), जेष्ठ सदस्य- रविशंकर पांडे (देशदुत, आरोग्य दुत) जिल्हा सचिव- दिनेश चौधरी, यशवंत पवार सर, सुनिल सोनार, राजु निकम संपादक (आर. डी. आर.न्यूज ) दिपक मुलमुले, राजु ठाकुर, उपस्थित होते.