असोदा येथील सार्वजनिक विद्यालयात नेताजी सुभाषचंद्र बोस यांना अभिवादन

70a28396 a500 4b49 8caa 446465e93d04

जळगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील असोदा येथील सार्वजनिक विद्यालयात नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंती निमित्त त्यांना आज अभिवादन करण्यात आले.

 

 

या प्रसंगी व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष विलास चौधरी,सचिव कमलाकर सावदेकर ,मुख्याध्यापिका व्ही एस खाचणे, पर्यवेक्षक डॉ, मिलींद बागुल, एन.एम.भंगाळे हे उपस्थित होते. विलास चौधरी यांच्या हस्ते नेताजींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. अनिता पाटील यांनी नेताजीं विषयी विद्यार्थ्यांना माहिती सांगितली. सूत्रसंचालन भावना चौधरी यांनी तर आभार सचिन जंगले यांनी मानले. याप्रसंगी कार्यक्रमाला सर्व शिक्षक व विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते. याप्रसंगी इयत्ता ५वी अ चा विद्यार्थी उमेश ढमाले याचे संस्थाध्यक्ष विलासदादा चौधरी यांच्या हस्ते वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन करण्यात आले.

Protected Content