पुणे (वृत्तसंस्था) ‘अश्लील उद्योग मित्र मंडळ’ या चित्रपटाच्या नावावर आक्षेप घेत चित्रपटाच्या नावात बदल करण्याची मागणी ब्राह्मण महासंघाने केली आहे.
आलोक राजवाडे दिग्दर्शित ‘अश्लील उद्योग मित्र मंडळ’ या चित्रपटाच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. अश्लील हा शब्द जरी मराठी भाषेत असला तरीदेखील तो उघडपणे आपण उच्चारत नाही. मात्र या चित्रपटाच्या नावातच अश्लील हा शब्द आहे. थोडक्यात, या नावावरुन चित्रपटात काहीतरी अश्लील दाखविण्यात येईल, असे प्रेक्षकांना भासविण्यात येत आहे. त्यामुळे लोकांमधील विकृतीही वाढताना दिसत आहे, असे ब्राम्हण महासंघाचे आनंद दवे यांनी सांगितले