जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील नागझिरी गावाजवळील गिरणा नदीच्या पात्रातून विना परवाना अवैधरित्या वाळू वाहतुक करणारे ट्रॅक्टरवर तालुका पोलीसांच्या पथकाने शनिवारी १ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजता कारवाई केली. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात ट्रॅक्टर चालकासह मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेली माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील नागझिरी गावाकडून गिरणा नदीपात्रात जाणाऱ्या कच्चा रोडवरुन विना क्रमांकाच्या ट्रॅक्टरमधून अवैधरित्या विना परवाना वाळूची वाहतुक होत असल्याची गोपनिय माहिती तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस उपअधिक्षक आप्पासो पवार यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पथकाला कारवाईच्यासुचना दिल्या. पथकाने शनिवारी १ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजता नागझिरी गावात कारवाई करत वाळूने भरलेले ट्रॅक्टर जप्त केले आहे. यावेळी ट्रॅक्टर चालक हा ट्रॅक्टर सोडून पसार झाला होता. यप्रकरणी पो.कॉ. महेंद्र सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चालक व मालक यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पुढील तपास पोना नरेंद्र पाटील हे करीत आहे.