अवैध वाळूची वाहतूक करणारे चार ट्रॅक्टर पकडले; रावेर पोलीसात गुन्हा

रावेर प्रतिनिधी । रावेर-पाल रस्त्यावर पोलिस प्रशासनाकडून अवैध वाळु वाहतुक करणाऱ्या ट्रॅक्टर-ट्रॉली सर्वात मोठी कारवाई करण्यात आली असून तब्बल चार वाळुने भरलेले ट्रॅक्टर जप्त करण्यात आली असून गुन्हा देखिल दाखल केला आहे.

अवैध वाळुने भरलेले चार ट्रॅक्टर-ट्रॉली दि १५ ऑक्टोबर रोजी रावेरच्या दिनशे निघाले ही कारवाई रावेर-पाल रस्त्यावर सहस्त्रलिंग गावा नजिक पोलिसां कडून करण्यात आली आहे. यामध्ये शंकर भील (पाल) यांचे एमएच १९ बिजी ९८२८ तर सुनिल राठोर विना नंबर ट्रॅक्टर (गुलाबवाडी) नाना बारेला विना नंबर ट्रॅक्टर (पाल) कैलास पवार विना नंबर ट्रॅक्टर (गुलाबवाडी) यांचे प्रत्येकी एक असे एकूण चार ट्रॅक्टर-ट्रॉली पोलिस प्रशासनाने एकाच वेळी तहसिल कार्यालयात जप्त करण्यात आले असून अवैध वाळुची कारवाई करणा-यांवर रावेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोलिस प्रशासन करीत आहे.

पाल मंडळ अधिकारी तलाठ्यांचे दुर्लक्ष
मोठ्या प्रमाणात पाल येथून अवैध वाळुची वाहतुक होत असते परंतु याकडे मंडळ अधिकारी व तलाठी यांचे सर्लास दुर्लक्ष होत आहे.पोलिस प्रशासनाने एकाच वेळी चार अवैध वाळुने भरलेले ट्रॅक्टर पकडले आहे. या भागातील तलाठी व मंडळ अधिका-यांचे जाणून-बुजुन दुर्लक्ष होत असल्याची ओरड आहे.

Protected Content