अवैध दारू अड्डे बंद करण्याच्या मागणीसाठी जनक्रांती मोर्चातर्फे तीव्र निदर्शने

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील पाडळसे गावात बेकायदेशीर सुरू असलेले अवैध दारू अड्डे कायमस्वरूपी बंद करावी या मागणीसाठी सोमवारी ३ जुलै रोजी दुपारी १ वाजता जनक्रांती मोर्चाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करण्यात आले.

 

जिल्हा प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यात असलेल्या पाडळसे गावात बेकायदेशीर अवैध दारू अड्डे बेसुमारपणे चालू आहे. या दारू अड्ड्यांमुळे गरीब कष्टकरी महिलांचे संसार उध्वस्त होत आहे. वारंवार फैज़पुर पोलिस स्टेशनला दारू अड्डे बंद करण्याबाबत तक्रारी केलेल्या आहे. तरी सुद्धा सुमारे १५ ते २० दारूअड्डे सर्रासपणे पोलिसांच्या आशीर्वादाने सुरू आहे. गेल्या ८ दिवसांपूर्वी २७वर्षाचा तुषार तावड़े नावाचा युवक विषारी दारू सेवन केल्याने मृत्यू झाला. याबाबत पोलीसांनी सखोल चौकशी करावी व दारू व्यवसाय करणाऱ्यानवर कठोर कारवाई करण्यात यावी, व सुरू असलेले दारू अड्डे कायमस्वरूपी दारू अड्डे बंद करण्यात यावे, यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयसमोर महाराष्ट्र जनक्रांती मोर्चा तर्फे तीव्र निदर्शने करण्यात आले. या मागणीचे निवेदन उपजिल्हाधिकारी व अप्पर पोलिस अधीक्षक यांना देण्यात आले.

 

याप्रसंगी हे निदर्शने जनक्रांती मोर्चाचे राज्य अध्यक्ष मुकुंद सपकाळे यांचे नेतृत्वात करण्यात आले. यावेळी जनक्रांति मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष सुरेश तायडे, जिल्हाध्यक्ष साहेबराव वानखेडे, संग्राम कोळी, सूरज कोळी, तुषार भोई, किरण तायड़े, विशाल सपकाळे, सय्यद टकारी , मनोज पाटील, इत्यादीसह गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Protected Content