भुसावळ, प्रतिनिधी । सध्या जळगाव जिल्ह्यात रेती व गौण खनिज माफियांच्या हौदोस सुरू आहे.रेती माफियांनी आता नवीन फंडा काढला असून खाजगी वाहने भाडे तत्वावर घेऊन प्रशासनाला चकमा देऊन सर्रास रेती वाहतूक करीत असल्याचे प्रकार घडत आहेत. वरिष्ठांच्या आदेशावरून असे एका वाहनाला दिनांक २१रोजी ऑक्टोबर रोजी अवैधरित्या रेती वाहतूक करीत असतांना बाजारपेठ पोलिसांनी ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला आहे.
सविस्तर वृत्त असे की,फिर्यादी संदीप बाबुराव परदेशी (वय 39 )यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी ताराचंद पुंडलिक पाटील (रा. बांभोरी तालुका धरणगाव), योगेश पितांबर सपकाळे (वय 45 रा. बांभोरी तालुका धरणगाव) याने त्यांचे ताब्यातील टाटा 709 गाडी क्रमांक 11 टी 3444 ही भरून अवैधरित्या विनापरवाना शिवाय लबाडीच्या इरादयाने चोरून नेत असतांना दिनांक 21 ऑक्टोबर रोजी रात्री 8.00 वाजेच्या सुमारास भुसावळ शहरात खडका चौफुली नवी ईदगाह समोर रोडवर सार्वजनिक जागी 1 ब्रास गौण खनिज 3,000 अंदाजे रुपये 2 लाख किंमतीची एक टाटा 709 गाडी क्रमांक 11 टी 3444 मधून अवैध रेतीचा वाहतूक करतांना मिळून आले.
मुद्देमाल व आरोपी सह ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला आणले असून आरोपी मालक ताराचंद पुंडलिक पाटील व ड्रायव्हर योगेश पितांबर सपकाळे यांचे विरुध्द भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनला भाग -5 गुरुन 900 /2020 भा.द.वि कलम 379 गौण खनिज कलम 48 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा तपास बाजारपेठचे निरीक्षक दिलीप भागवत यांच्या आदेशाने पोहेकॉ देवेंद्र पगारे करीत आहे.