अवचित हनुमान मंदिराजवळ ना. गुलाबराव पाटील यांची लाडू तुला

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | आपल्या आयुष्यात अनेक चढ-उतार आले तरी परमेश्‍वरी कृपा आणि जनतेच्या प्रेमामुळे आपण या सर्वांवर मात करत आगेकूच सुरू ठेवली. जनतेचे प्रेम हीच आपली खरी श्रीमंती असून याचमुळे आपल्याला त्यांची सेवा करण्यासाठी उर्जा मिळत असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले.

 

तालुक्यातील रिधूर येथील अवचित हनुमान मंदिर परिसरात ना. गुलाबराव पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांची बुंदी लाडू तुला करण्यात आली याप्रसंगी पालकमंत्री बोलत होते. याप्रसंगी त्यांनी आपल्या आयुष्यात परमेश्‍वर भक्तीचे मोठे योगदान असल्याचे आवर्जून नमूद केले. या कार्यक्रमाला परिसरातील सर्व सरपंच तसेच अन्य लोकप्रतिनिधी, शिवसेना व युवासेनेचे पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचा वाढदिवस विविध समाज उपयोगी उपक्रमांनी साजरा केला जात आहे. यानिमित्त आजपासून मतदारसंघात विविध कार्यक्रम सुरू झाले आहेत. यात आज जळगाव तालुक्यातील रिधूर जवळच्या अवचित हनुमान मंदिर परिसरात पालकमंत्र्यांच्या बुंदी लाडू तुलेचे आयोजन करण्यात आले. प्रारंभी फाट्यापासून ते हनुमान मंदिरापर्यंत पालकमंत्र्यांची अतिशय उल्हासात व ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. यानंतर ना. पाटील यांच्या हस्ते श्री हनुमानाची आरती करण्यात आली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालक शिवसेनेचे तालुका प्रमुख राजेंद्र चव्हाण यांनी केले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून विधानसभा मतदारसंघाचे संपर्क प्रमुख अरविंद नाईक, जिल्हा उपसंघटक नरेंद्र सोनवणे, बाजार समिती उपसभापती सुरेश पाटील, संगोयोचे चेअरमन रमेशआप्पा पाटील, दिलीप जगताप, उपतालुका प्रमुख प्रमोद सोनवणे, धोंडू जगताप, योगेश लाठी, माजी सभापतीं जनाआप्पा कोळी, विभाग प्रमुख गजानन सोनवणे, विकासोसायटी चेअरमन एकनाथ सोनवणे, डॉ. कमलाकर पाटील, तालुका पी.आय. रामकृष्ण कुंभार, जेष्ठ शिवसैनिक भगवान कुंभार, घार्डी सरपंच लिलाधार पाटील, नितीन सोनवणे, गोपाल जीभाऊ , रामचंद्र बापू पाटील, पाटील डॉक्टर सुनील चव्हाण, आनंदा सपकाळे डॉ. सत्वशील पाटील, वासुदेव सोनवणे, सुभाषआप्पा बडगुजर, शिवाजीअण्णा सोनवणे, बाळू पाटील, गुड्डू सपकाळे, आदी मान्यवरांची उपस्थिती होती. विधानसभा मतदारसंघाचे संपर्क प्रमुख अरविंद नाईक आणि डॉ. कमलाकर पाटील यांनी आपल्या मनोगतातून पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या कामाचा गौरव केला.

पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी हनुमान मंदिराच्या परिसरातील हा कार्यक्रम आपल्यासाठी खूप महत्वाचा असल्याचे नमूद केले. ते म्हणाले की, जळगाव ग्रामीण मतदारसंघातील विविध तीर्थक्षेत्रांचा विकास करण्याचा संकल्प आपण केलेला आहे. यात श्रीक्षेत्र रामेश्‍वरम, कानळदा येथील महर्षी कण्वाश्रम, तरसोद येथील श्रीगणेश मंदिर, नशिराबाद येथील झिपरूअण्णा महाराज यांची समाधी आदी तीर्थक्षेत्रांच्या विकासासाठी निधी मिळाला असून याच्या कामांना गती मिळालेली आहे. याच प्रमाणे लवकरच उर्वरित तीर्थक्षेत्रांचा विकास करण्यात येणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. ते म्हणाले की, आपल्या वाटचालीत आध्यात्मीकतेचा खूप मोठा वाटा आहे. अनेक खाचळग्यांमधून चालतांना आपल्या उपयोगात परमेश्‍वरी कृपा आली. याच्या जोडीला जनतेचे प्रेम असल्याने आपण इथवर येऊन पोहचल्याची कृतज्ञता त्यांनी व्यक्त केली.

दरम्यान, 3 वर्षांपासून आपण वाढदिवस साजरा केला नसून यंदा फक्त समाज उपयोगी उपक्रमांच्या माध्यमातून वाढदिवस साजरा होत असल्याची माहिती ना. पाटील यांनी दिली. ते म्हणाले की, समाजातील शोषीत आणि वंचित घटकांच्या उपयोगात आपण आलो पाहिजे. त्यांच्यासाठी आपण विविध उपक्रम राबविले पाहिजेत असे निर्देश आपण सर्व पदाधिकार्‍यांना दिले आहेत.

या कार्यक्रमाचे आभार दिलीप जगताप यांनी मानले. कार्यक्रमाचे नियोजन जना आप्पा कोळी दिलीप जगताप,भगवान कुंभार व पदाधिकारी यांनी केले होते.

Protected Content