गोपाळगंज (वृत्तसंस्था) अतिवृष्टीमुळे २९ दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी उद्घाटन केलेल्या गोपाळगंजमधील पूलाचा पूलाचा एक भागच वाहून गेला आहे. यामुळे तब्बल २६४ कोटी रूपये पाण्यात गेल्याची टीका विरोधकांकडून सुरु झाली आहे.
१६ जून रोजी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून या पूलाचे उद्घाटन केले होते. दरम्यान पाण्याचा प्रवाह वाढल्यामुळे या पूलाचा काही भाग पाण्यात वाहून गेला आहे. नदीवर असलेला हा पूल सध्या वाहून गेल्याने या पूलामुळे जोडल्या जाणाऱ्या दोन गावांचा संपर्क तुटला आहे. लालछापर, मुजफ्फरपूर, मोतिहारी आणि बेतिया या गावांचा एकमेकांशी संपर्क तुटला आहे. या पूलाचे बांधकाम ब्रीज निर्माण विभागाकडून करण्यात आले होते. २०१२ मध्ये या पूलाच्या बांधकामाला सुरुवात झाली होती त्यानंतर संपूर्ण बांधकाम पूर्ण होऊन १६ जून २०२० मध्ये या महासेतू पूलाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्धाटन करण्यात आले होते. दरम्यान, आरजेडी नेता तेजस्वी यादव यांनी खबरदार, जर कोणी नितीश कुमार यांना भ्रष्टाचारी म्हटले तर…२६३ कोटी सुशासनाचा दिखावा आहे इतक्या पैशात त्यांचे उंदिर दारू पितात असा टोला नितीश कुमारांना लगावला आहे. गोपालगंजमध्ये बुधवारी तीन लाख क्युसेकपेक्षा अधिक पाण्याचा प्रवाह होता. या पाण्याच्या प्रवाहामुळेच हा पूल वाहून गेल्याचे सांगण्यात येत आहे.