जामनेर लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जामनेर शहरातील भुसावळ रोडवरील दुकानाजवळून अज्ञात व्यक्तीने एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेण्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या संदर्भात जामनेर पोलीस ठाण्यात गुरुवारी २७ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जामनेर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, जामनेर शहरातील भुसावळ रोडवरील स्वामी रेडियम दुकानाजवळ १५ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही मैत्रीणीसोबत शुक्रवारी २७ एप्रिल रोजी दुपारी १ वाजता लस्सी पिण्यासाठी दुकानावर आल्या होत्या. त्यावेळी अज्ञात व्यक्तीने अल्पवयीन मुलीला काहीतरी कारण सांगून फूस लावून अपहरण केले. पीडित मुलीच्या नातेवाईकांनी तिचा जामनेर शहरातील बाजारात शोध घेतला. परंतू कुठेही काहीही माहिती मिळाली नाही. अखेर नातेवाईकांनी जामनेर पोलीस ठाण्यात सायंकाळी ७ वाजता धाव घेऊन तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्ती विरोधात जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल अनिल वाटे करीत आहे.