जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शनिपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सुभाष चौक परिसरातून १३ वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याचे शुक्रवार ५ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास उघडकीला आले आहे. या संदर्भात रात्री ११ वाजता शनिपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका भागात १३ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. जळगाव शहरातील सुभाष चौक परिसरातील भवानी मंदिर परिसरात शुक्रवारी ५ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता पीडित मुलगी ही आलेली होती. त्यानंतर ती बेपत्ता झाली होती. तिच्या नातेवाईकांनी तिचा सर्वत्र शोध घेतला, परंतु काहीही माहिती मिळाली नाही. त्यावेळी तिच्या अज्ञानपणाचा फायदा घेत तिला कुणीतरी अज्ञात व्यक्तीने तिला काहीतरी आमिष दाखवत फूस लावून पळून नेले आहे, अशी तक्रार तिच्या नातेवाईकांनी पोलिसात दिले. नातेवाईकांनी दिलेल्या तक्रारीवरून रात्री ११ वाजता शनिपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रिया दातीर ह्या करीत आहे.