यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील आडगाव येथील एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचा हात पकडून विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत यावल पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, यावल तालुक्यातील आडगाव जवळील रोडवर १७ वर्षीय मुलगी ही शनिवारी २६ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजता शौचावरून परत घरी येत असताना संशयित आरोपी जावेद समशेर तडवी रा. आडगाव ता.यावल यांनी तिचा पाठलाग करून तिचा हात पकडला. तू माझ्या घरी जेवायला चल असे म्हणून तिला अश्लील शिवीगाळ करून जीवे ठार मारण्याची धमकी देत तिचा विनयभंग केला आहे. या संदर्भात अल्पवयीन मुलीने हा प्रकार आपल्याला नातेवाईकांना सांगितल्यानंतर पीडित मुलीसह तिच्या नातेवाईकांनी यावल पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून संशयित आरोपी जावेद समशेर तडवी याच्या विरोधात यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रदीप बोरुडे करीत आहे.