पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पारोळा तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग करत जीवेठार मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पारोळा पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पारोळा पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, पारोळा तालुक्यातील एका गावात १५ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. गुरूवारी २९ जून रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास अल्पवयीन मुलगी ही घरी एकटीच होती. या संधीचा फायदा घेत गावातील राजेंद्र अर्जून पाटील याने घरात घुसून मुलीसोबत अश्लिल चाळे केले. त्यानंतर तिचा हात ओढून अंगलट करून विनयभंग केला. एवढेच नाही तर हा प्रकार कुणाला सांगितला तर जीवेठार मारण्याची धमकी दिली. हा प्रकार घडल्यानंतर पीडित मुलीच्या आईने पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार संशयित आरोपी राजेंद्र अर्जून पाटील याच्या विरोधात गुन्हा पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास डीवायएसपी सुनिल नंदवाळकर हे करीत आहे.