भुसावळ प्रतिनिधी – येथील नॅशनल हायवे वरील अलिशा वॉटर पार्क मध्ये गेलेल्या तरुणांचा मृत्यू झाल्याची घटना सायंकाळी घडल्यामुळे परिसरात शोकाकुल वातावरण निर्माण झाले आहे.
सात ते आठ जण महिला व पुरुष सायंकाळी नॅशनल हायवे वरील अलिशा वॉटर पार्क मध्ये गेले असता अचानक अमर दिगंबर तायडे वय ३८ ह्या तरुणाला अंघोळ करून आलेला असल्यामुळे थरथरी भरली गेली व अलिशा वॉटर पार्क मध्ये उलटी झाल्यामुळे त्या पार्क मधील कर्मचारी त्वरित पळत येऊन तरुणाची छाती व हातपाय चोळू लागले व त्यांनी ताबडतोब रुग्णवाहिका बोलविण्यासाठी फोन केला असता सोबत आलेल्या परिवारातील लोकांनी दुचाकी वर अमर दिगंबर तायडे यांनी उपचारासाठी डॉ. मानवतकर यांच्या दवाखान्यात नेत असतांना मृत्य झाल्याची घटना दिनांक १७ मार्चला घडली. झालेल्या घटनेची माहिती डॉ.मानवतकर यांनी बाजारपेठ पोलीस स्टेशनला कळविल्यामुळे अकस्मात मृत्यू सी.आर.पी.सी.१७४ प्रमाणे नोंद करण्यात आली आहे.तपास पो.कॉ.नागरुत करीत आहे. पोलीस स्टेशनला उपविभागीय अधिकारी गजानन राठोड,बाजारपेठ पोलीस स्टेशनचे प्रभारी निरीक्षक बाबासाहेब ठोंबे यांच्या उपस्थितीत अकस्मात मृत्यू ची नोंद करण्यात आली आहे. शवविच्छेदनासाठी यावल रुग्णालयात मृतदेह पाठविण्यात आला आहे.