अर्थसंकल्प सादरीकरणास प्रारंभ

 

नवी दिल्ली, वृत्तसंस्था । केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत अर्थसंकल्प सादरीकरणास प्रारंभ केला आहे. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर आरोग्य क्षेत्रासाठी भरीव तरतूद, कोरोना लसीकरणासाठी ३५ हजार कोटींची तरतूद केली आहे.

कृषी कायद्यांवरून सदस्यांचा गोंधळ सुरू असतानाच सीतारामन यांचं भाषण सुरू केले. त्यांनी २०२१ या वर्षाचे देशाचा अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी गेल्या काही कालावधीत आणि लॉक डाऊन दरम्यान सरकारने केलेल्या कार्याची माहिती दिली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या वर्षीचा अर्थसंकल्प कोणत्याही कागदपत्रांशिवाय टॅबच्या साह्याने हा अर्थसंकल्प मांडण्यात येत आहे. तीन आठवड्याच्या लॉकडाऊन दरम्यान पंतप्रधान गरीब कल्याण योजनेची सुरुवात करण्यात आली असून त्याचा फायदा देशातील ८० कोटी लोकांना झाल्याची माहिती अर्थमंत्री सीतारामन यांनी अर्थसंकल्प मांडला पूर्वी दिली.

Protected Content