मुंबई, वृत्तसंस्था । राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशनाला प्रारंभ होण्यापूर्वीच ३२ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहत. यात विधान भवनाचे कर्मचारी आणि प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधींचा देखील समावेश आहे.
आजपासून सुरू होत असलेल्या अधिवेशनासाठी जवळपास ३ हजारपेक्षा जास्त टेस्ट करण्यात आल्या. त्यात मंत्रालय विधिमंडळ कर्मचारी तसंच पोलीस सुरक्षारक्षक प्रसारमाध्यम आमदार यांचा समावेश आहे. आत्तापर्यंतच्या माहितीनुसार तीन हजार पैकी ३२ जण पॉझिटिव्ह आल्याचे आढळून आले आहे. यात विधिमंडळ मंत्रालय कर्मचारी तसंच पोलीस, सुरक्षारक्षक, प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी यांचा समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे. ज्या लोकांच्या टेस्ट पॉझिटिव्ह आल्या आहेत, अशांना तात्काळ स्वतंत्र विलगीकरणात जाण्यास सांगितले असून लक्षणं आढळत असल्यास रुग्णालयात दाखल करण्याची सूचना देखील देण्यात आल्याची माहिती विधानभवनाकडून देण्यात आली आहे.