अर्णब गोस्वामी यांच्याविरोधात हक्कभंग प्रस्ताव

मुंबई वृत्तसंस्था । रिपब्लिकन टिव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्याविरोधात हक्कभंग प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी नियम २७३ अन्वये विशेषाधिकार भंगाचा प्रस्ताव आणला असून त्याला मंजुरी देण्याची मागणी केली आहे.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी संपादक अर्णब गोस्वामी यांनी मुख्यमंत्री तसेच नेत्यांचा एकेरी भाषेत उल्लेख करत अवमान केला आहे. तो हेतुपुरस्सर आणि आक्षेपार्ह असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

प्रताप सरनाईक यांच्या या प्रस्तावानंतर विधानसभेत गदारोळ झाला . भाजपानं गदारोळ घातला. “अर्णब गोस्वामी हेतुपुरस्सर कपोलकल्पित बोलून स्वातंत्र्याच्या नावाखाली दिशाभूल करत आहेत. रिपब्लिक टीव्ही ही वृत्तवाहिनी बंद करण्यात यावी,” अशी मागणी सरनाईक यांनी प्रस्ताव मांडताना केली.

“अर्णब गोस्वामी हे न्यायाधीशआंच्या भूमिकेत आले असून स्वत: खटला चालवत आहेत. तेच निकालही देत आहेत,” असं म्हणत परिवहन मंत्री अनिल परब यांनी हल्लाबोल केला. “भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या राज्यघटनेनुसार प्रसारमाध्यमांना चौकट आखून देण्यात आली आहे. अर्णब गोस्वामी हे स्वत:ला न्यायाधीश समजतात का? ते सुपारी घेऊन काम करतात. त्यांना शिक्षा झाली पाहिजे. पत्रकार संरक्षण कायदा आणला म्हणून त्यांनी काहीही करावं का?,” असा सवालही त्यांनी केला.गदारोळामुळे कामकाज १० मिनिटांसाठी तहकूब करण्यात आलं होतं

Protected Content