नवी दिल्ली वृत्तसंस्था । वादग्रस्त संपादक अर्णव गोस्वामी यांच्या रिपब्लिक भारत या हिंदी वृत्तवाहिनीला द्वेष पसरवल्याबद्दल ब्रिटनच्या प्रसारण नियामक मंडळाने दंड ठोठावला आहे.
ब्रिटनमधील लायसन्स असलेल्या वर्ल्डव्ह्यू मीडिया नेटवर्कला तेथील प्रसारण मंडळानं २० लाखांच्या दंडाची नोटीस पाठवली आहे. एखाद्या समाजाबद्दल किंवा द्वेषाची भावना निर्माण होईल असे कार्यक्रम यापुढे वाहिनीवर चालवले जाणार नाहीत याची लेखी हमी देखील देण्याचे आदेश मरिपब्लिकफला देण्यात आले आहेत.
अर्णव गोस्वामी यांच्या पूछता है भारत या टीव्ही शोमध्ये ६ सप्टेंबर २०१९ रोजी झालेल्या चर्चेबाबत ही कारवाई करण्यात आली आहे. या कार्यक्रमात गोस्वामी यांच्याकडून पाकिस्तानी नागरिकांवर वारंवार हल्ला आणि त्यांच्याविरोधात समाजात द्वेष पसविण्याचं काम केल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.
भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाची परिस्थिती असतानाच अशा टेलिव्हिजन कार्यक्रमांचं आयोजन करुन तणावात भर टाकण्याचं काम केलं गेलं, असा ठपका रिपब्लिक भारतवर ठेवण्यात आला आहे.