जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्हा कोवीड रूग्णालयाने आज पाठविलेल्या कोरोना अहवालात दिवसभरात तब्बल ४६९ कोरोना संक्रमित रूग्ण आढळून आले. तर ७९ रूग्ण बरे होवून घरी गेलेत. जळगाव शहरासह भुसावळ, अमळनेर, एरंडोल आणि चाळीसगाव तालुक्यात कोराना रूग्ण संख्या वाढली असल्याचे अहवालातून दिसून येत आहे.
तालुकानिहाय आकडेवारी
जळगाव शहर-१२६, जळगाव ग्रामीण-२२, भुसावळ-११८, अमळनेर-३७, चोपडा-५५, पाचोरा-१३, भडगाव-०, धरणगाव-५, यावल-६, एरंडोल-४०, जामनेर-८, रावेर-१, पारोळा-०, चाळीसगाव-३३, मुक्ताईनगर-४, बोदवड-० आणि इतर जिल्ह्यातील १ असे एकुण ४६९ संक्रमित रूग्ण आढळून आले आहे.
जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत एकुण १ लाख ४६ हजार २५४ कोरोना संक्रमित रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी १ लाख ४० हजार ८०६ कोरोना बाधित रूग्ण उपचार घेवून घरी परतले आहे. जिल्ह्यात सध्या २ हजार ८६८ संक्रमित रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे अशी माहिती दिलेल्या प्रसिध्दीपत्राकान्वये कळविले आहे.
दरम्यान, आजच्या अहवालाचा विचार केला असता जळगाव, भुसावळ, चोपडा, अमळनेर, चाळीसगाव आदी तालुक्यांमध्ये संसर्ग वाढीस लागल्याचे दिसून येत आहे. कोरोनाची वाढती संख्या लक्षात घेऊन प्रशासनाने काही दिवसांपूर्वींच नवीन नियमावली जाहीर केली आहे. आता रूग्ण संख्या वाढत असल्याने या नियमावलीचे पालन करावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे.