Home Cities अमळनेर अरे देवा : जिल्ह्यात पुन्हा २२ नवीन कोरोना बाधीत

अरे देवा : जिल्ह्यात पुन्हा २२ नवीन कोरोना बाधीत

0
260

जळगाव प्रतिनिधी । आज सयंकाळी आलेल्या रिपोर्टमध्ये जिल्ह्यात २२ नवीन कोरोना बाधीत आढळले असून यात जिल्ह्यात कोरोनाची व्याप्ती वाढत असल्याचे दिसून आले आहे.

जिल्हा माहिती कार्यालयाने आज सकाळी एका प्रेस नोटच्या माध्यमातून कोरोना बाधितांबाबत माहिती जाहीर केली आहे. यानुसार-जिल्ह्यात जळगाव, भुसावळ, रावेर, फैजपूर, चोपडा, अमळनेर, भडगाव, यावल येथील स्वॅब घेतलेल्या 78 कोरोना संशयित व्यक्तीचे नमुना तपासणी अहवाल आज प्राप्त झाले आहे. यापैकी 56 व्यक्तीचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले असून बावीस व्यक्तींचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तींमध्ये भुसावळ येथील एक, जळगाव शहरातील दर्शन कॉलनीतील दोन, गेंदालाल मील एक, पवननगर भागातील एक असे चार, चोपडा येथील सात, अडावद येथील एक, भडगाव शहरातील चार व निंभोरा येथील एक; फैजपूर एक, यावल एक आणि अमळनेर येथील दोन अश्या एकूण बावीस रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, आजच्या रिपोर्टचे वैशिष्ट्य म्हणजे कोरोनाने यावल तालुक्यात शिरकाव केल्याचे दिसून येत आहे. यावल शहरासह तालुक्यातील फैजपूर येथे आज पहिले कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण आढळून आले आहेत. यामुळे कोरोनाची जिल्ह्यातील व्याप्ती वाढत असल्याचेही यातून अधोरेखीत झाले आहे.

जिल्ह्यात आजपर्यंत कोरोना बाधित रूग्णांची संख्या 232 इतकी झाली असून त्यापैकी पस्तीस व्यक्ती कोरोनामुक्त होऊन घरी गेल्या आहेत तर अठ्ठावीस कोरोना बाधित रूग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता नागरीकांनी घाबरुन न जाता जागरुक रहावे. लॉकडाऊनचे पालन करावे. शक्यतो घराबाहेर पडू नये. अत्यंत आवश्यकता असेल तर घराबाहेर पडताना मास्कचा वापर करावा. जीवनावश्यक वस्तुंची खरेदी करतांना सोशल डिस्टनिंगचे पालन करावे. दिवसातून चार/पाच वेळा हात साबणाने स्वच्छ धुवावे. कोरोना सदृश्य लक्षणे आढळून आल्यास त्वरीत तपासणी करुन घ्यावी. असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी केले आहे.


Protected Content

Play sound