नवी दिल्ली वृत्तसंस्था । लॉकडाऊनमध्ये दारूची दुकाने उघडल्यानंतर उडालेली ग्राहकांची झुंबड पाहता दिल्ली सरकारने दारूच्या बाटल्यांवरील एमआरपीवर तब्बल ७० टक्के कोरोना टॅक्स लावण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे दिल्ली सरकारचे अनुकरण महाराष्ट्रासह अन्य राज्ये करणार का ? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
देशातील काही राज्य सरकारांनी दारूची दुकाने सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यात महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांचा समावेश आहे. दरम्यान, अनेक दिवसानंतर दारूची दुकाने उघडत असल्याने अनेक ठिकाणी मद्यप्रेमींची दुकानांवर प्रचंड गर्दी उसळल्याचे दिसून आले. काही ठिकाणी तर पोलीस बंदोबस्त देखील लावण्यात आलेला आहे. एकीकडे दारू दुकानांवर तळीरामांची गर्दी उसळली असतांना राज्य सरकारांनी याला आटोक्यात आणण्यासाठी उपाययोजनांवर विचार करण्यास सुरूवात केली आहे. यात दिल्ली सरकारने अफलातून शक्कल लढविली आहे.
दिल्लीतील केजरीवाल सरकारने कोणत्याही दारू बाटलीवर असणार्या छापील मूल्याच्या (एमआरपी) तब्बल ७० टक्के कोरोना टॅक्स लावण्याचे जाहीर केले आहे. अर्थात, यामुळे १०० रूपयांची बाटली ही ग्राहकाला १७० रूपयात पडणार आहे. यामुळे सरकारच्या तिजोरीत भर पडणार असून सोबतीला दारू दुकानांवरील गर्दी कमी होण्याची शक्यता देखील आहे. दिल्ली सरकारचा कोरोना टॅक्स आजपासून अंमलात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. यामुळे दिल्ली सरकारचे अनुकरण महाराष्ट्रासह अन्य राज्ये करणार का ? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !
वेबसाईट : https://livetrends.news
फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01
ट्विटर हँडल : https://twitter.com/LiveTrends_News
युट्युब चॅनल : https://bit.ly/342HcXH
इन्स्टाग्राम अकाऊंट : https://www.instagram.com/live_trends_news
व्हाटसअॅप क्रमांक : ९३७०४०३२००