Home धर्म-समाज अयोध्येतील श्रीराम मंदिराचे 30 एप्रिलला भूमिपूजन : गोविंदगिरी महाराज

अयोध्येतील श्रीराम मंदिराचे 30 एप्रिलला भूमिपूजन : गोविंदगिरी महाराज


अहमदनगर (वृत्तसंस्था) अयोध्येत उभारण्यात येणाऱ्या श्रीराम मंदिराचे ३० एप्रिल रोजी भूमिपूजन करण्यात येणार असल्याची माहिती गोविंदगिरी महाराज यांनी आज अहमदनगर येथे दिली आहे.

 

गोविंदगिरी महाराज म्हणाले, ४ एप्रिल रोजी अयोध्येत श्रीराम मंदिर ट्रस्टच्या विश्वस्ताची बैठक होईल. त्यात ३० एप्रिल रोजी मंदिराच्या भूमिपूजन कार्यक्रम निश्चित करण्यावर शिक्कामोर्तब होईल. संपूर्ण मंदिर हे पाषाणाचे बनविले जाणार आहे. त्यासाठी किती खर्च येईल ? याचा आकडा चार एप्रिल रोजी ठरेल. मंदिर भव्य असेल. राम मंदिर ट्रस्टकडून अयोध्येत खाते उघडण्यात येणार असून, त्यात ऑनलाईन निधी संकलन होणार आहे, असे गोविंदगिरी महाराज म्हणाले. दरम्यान, ३० एप्रिल रोजी राम मंदिराच्या भूमिपूजन प्रसंगी पंतप्रधान व संघाचे सरसंघचालक उपस्थित राहतील, असेही त्यांनी सांगितले.


Protected Content

Play sound