जळगाव शहरातील आयोध्यानगर परिसरातून एका व्यापाऱ्याची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. या संदर्भात सोमवारी १७ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, उमानाथ रामनाथ तिवारी (वय-५५) रा. आयोध्या नगर, जळगाव हे व्यापारी असून व्यापार करून आपला उदरनिर्वाह करतात. १२ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता अयोध्यानगराच्या त्यांच्या घरासमोर त्यांची दुचाकी (एमएच १९ सीडी ६४३०) ही पार्किंगला लावलेली होती. अज्ञात चोरट्यांनी ही दुचाकी चोरून नेले. दुपारी ३ वाजता उमानाथ तिवारी यांना दुचाकी चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यांनी दुचाकीचा सर्वत्र शोध घेतला, परंतु त्यांना दुचाकी कुठेही मिळून आली नाही, अखेर सोमवारी १७ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल गणेश शिरसाट करीत आहे.