पुणे । दिल्लीतील हिंसाचाराची जबाबदारी स्वीकारून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी आज खासदार अमोल कोल्हे यांनी केली.
खासदार अमोल कोल्हे पुणे महापालिकेत हडपसर विधानसभा मतदारसंघाच्या समस्यांचा आढावा घेण्यासाठी आले होते. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. याप्रसंगी ते म्हणाले की, दिल्लीत सुरु असलेली दंगल हे केंद्र सरकारचे अपयश आहे. या घटनेची जबाबदारी स्विकारून केंद्रीय गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी खासदार कोल्हे यांनी केली. याप्रसंगी त्यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले.