अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघटनेची कार्यकारिणी जाहीर

 

अमळनेर -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघटनेची बैठक दि ४ जानेवारी रोजी जि.प.विश्रामगृहात पार पडुन संघटनेची तालुका आणि शहर कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.

याप्रसंगी अध्यक्षपदी चेतन राजपुत यांची पुनश्च निवड करण्यात आली. तर सचिवपदी जितेंद्र ठाकुर व उपाध्यक्षपदी आर. जे.पाटील यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ पत्रकार संजय पाटील होते. त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. तसेच याप्रसंगी, ६ जानेवारी रोजी पत्रकार दिन साजरा करण्याबाबत चर्चा करण्यात आली व सानेगुरुजी शाळेशेजारी असलेल्या भव्य पटांगणात दि ६ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता कार्यक्रम घेण्याचा निर्णय घेण्यात आला.

यावेळी संघटनेच्या कार्यकारिणीची फेररचना करण्यासंदर्भात चर्चा झाली असता सर्वानुमते अध्यक्षपदी चेतन राजपूत यांची पुन्हा निवड करण्यात आली तर सचिव पदी जितेंद्र ठाकुर व उपाध्यक्षपदी आर.जे.पाटील यांची निवड झाली. याशिवाय उर्वरित कार्यकारिणी देखील गठीत करण्यात आली.नूतन पदाधिकारी यांचा सर्वांनी सत्कार केला.

यावेळी पांडुरंग पाटील, चंद्रकांत काटे,महेंद्र रामोसे,चंद्रकांत पाटील,बाबूलाल पाटील,महेंद्र पाटील,अमोल पाटील,मुन्ना शेख,डॉ विलास पाटील ,युवराज पाटील,अनिल पाटील,काशिनाथ चौधरी,गणेश पाटील,शामकांत पाटील, संभाजी देवरे,वसंतराव पाटील, विकी जाधव,हिरालाल पाटील,आबीद शेख,गजानन पाटील,विजय पाटील,कुंदन खैरनार,सदानंद पाटील,किशोर पाटील,गणेश चव्हाण,अरुण पवार,मनोज चित्ते,स्वप्निल माळी, योगेश पाने उपस्थित होते.

दरम्यान ६ जानेवारी रोजी पत्रकार बांधवाना शुभेच्छा देण्यासाठी येताना कुणीही भेटवस्तू आणू नये अशी विनंती वजा आवाहन पत्रकार संघटनेतर्फे करण्यात आले आहे.

Protected Content