अमळनेर येथे राष्ट्रीय किसान मोर्चातर्फे केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात आंदोलन

अमळनेर, प्रतिनिधी | ओबीसींची जातिनिहाय जनगणना केंद्र शासनाने करावी, तीन कृषी काळे कायदे रद्द करावेत व ईव्हीएम वरील निवडणूक रद्द करून सर्व निवडणुका बॅलेट पेपर घेण्यात याव्यात. या प्रमुख मागण्यांसाठी अमळनेर तालुक्यातील तिसऱ्या चरणात राष्ट्रीय किसान मोर्चाचे अध्यक्ष , रमेश व्यंकट बोढरे यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालयात आंदोलन करण्यात आले. यावेळी ओबीसींच्या जनगणनेच्या सरकारने जर विचार केला नाही तर आम्ही चौथ्या चरणात जेलभरो आंदोलन करू असा इशारा देण्यात आला.

 

केंद्र सरकारने पाच जून 2020 रोजी , शेतकरी हिताच्या विरोधात तीन कृषी अध्यादेश पारित केले .त्यावेळी राष्ट्रीय किसान मोर्चाचे मार्गदर्शक संरक्षक मा वामन मेश्राम साहेब यांच्या नेतृत्वाखाली दिनांक 16 ऑगस्ट 2020 रोजी पहिल्या चरणात आंदोलन करण्यात आले परंतु कृषी विषयक काळे कायदे रद्द न झाल्यामुळे ,आज तिसऱ्या चरणात काळे कायद्याच्या विरोधात ,अमळनेर येथे आंदोलन करण्यात आले. आंदोलना प्रसंगी राष्ट्रीय किसान मोर्चाचे वरिष्ठ उपाध्यक्ष प्रा. शिवाजीराव बाजीराव पाटील, जिल्हाध्यक्ष प्रा.विश्वासराव भास्कराव पाटील , बहुजन मुक्ती पार्टी कार्याध्यक्ष अक्षय बाविस्कर, भूपेंद्र शिरसाठ तसेच राष्ट्रीय किसान संघटनेचे व सहयोगी संघटनेचे कार्यकर्ते तहसीलदार निवेदन देताना उपस्थित होते.

Protected Content