Home Cities अमळनेर अमळनेर येथे मंदिरासमोरून दुचाकीची चोरी

अमळनेर येथे मंदिरासमोरून दुचाकीची चोरी


 

 

अमळनेर प्रतिनिधी । शहरातील तरणाची दुचाकी मंगळग्रह मंदिरासमोरून अज्ञात चोरट्याने लांबविल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. अमळनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

स्वप्निल वाल्मिक चौधरी (वय-२५ , रा. शिख जीन समोर अमळनेर ) हे खासगी दुकानावर कामाला आहे. त्यांच्याकडे कामासाठी (क्रमांक एमएच १९ डीपी २९७६) दुचाकी आहे. ६ डिसेंबर रोजी सांयकाळी ७ वाजेच्या सुमारास कामाच्या निमित्ताने मंगळग्रह मंदीरासमोर आले. सार्वजनिक जागेवर आपली दुचाकी पार्कींग करून कामाच्या ठिकाणी गेले. रात्री ८ वाजेच्या सुमारास पुन्हा जागेवर येवून पाहिले असता त्यांना दुचाकी आढळून आली नाही. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ सुनिल पाटील करीत आहे.


Protected Content

Play sound