केंद्राच्या शेतकरी विरोधी काळे कायद्याविरोधात सामजिक संघटनाचे आंदोलन (व्हिडिओ)

 

जळगाव, प्रतिनिधी । केंद्र सरकारने पारित केलेले शेतकरी विरोधी कायदे मागे घ्यावेत व रिलान्सन सारख्या भांडवली समुहाच्या विरोधात सामजिक संघटनाचे प्रमुख आणि शेतकरी संघटनाचे प्रमुख यांनी जळगाव शहरातील राष्ट्रीय महामार्गावरील रिलायन्स पेट्रोल पंपावर केंद्र सरकारच्या विरोधात निदर्शने केली.

दिल्लीत मागील १५ दिवसापासून सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनास पाठींबा देण्यासाठी व आडणी अंबानी या भांडवलदारांच्या इशाऱ्यावर चालणाऱ्या केंद्र सरकारचा धिक्कार करण्यासाठी जळगाव शहरातील रिलायन्स पेट्रोल येथे आंदोलन करण्यात येत असल्याचे भारत मुक्ती मोर्चाचे मुकुंद सपकाळे यांनी सांगितले. केंद्र लागू करीत असलेले कायदे हे शेतकऱ्यांचे उत्पन्न धनदांडग्यांच्या घशात घालणारे व शेतकऱ्यांना देशोधडीला लावणारे कायदे असल्याचा आरोप श्री. सपकाळे यांनी केला. पंतप्रधान मोदी यांनी दिल्लीतील आंदोलोकांसाबोत चर्चा करून कायदे रद्द करत शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अन्यथा उद्या शुक्रवार ११ डिसेंबरपासून जळगाव जिल्ह्यात तालुका तालुक्यात, खेडोपाडी जाऊन रिलायन्स कंपनी विरोधात जागृती करू असा इशारा श्री. सपकाळे यांनी दिला. याप्रसंगी छावा मराठा युवा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अमोल कोल्हे, मणियार बिरादरीचे फारुख शेख, लोकसंघर्ष मोर्चाचे सचिन धांडे, बुलंद छावा अध्यक्ष प्रमोद पाटील, सै. नियाज अली भैय्या मल्टिपर्पज फाउंडेशनचे अयाज आली, सावरकर रिक्षा युनियनचे दिलीप सपकाळे , श्रीकांत मोरे, कादरिया फौंडेशनचे फारुख कादरी,एमआयएमचे जिया बागवान, सिद्धार्थ शिरसाठ, योगेश गाजरे, दामू भारंबे, फईम पटेल, अभिषेक कदम, मनोज अहिरे, अलु शे. खाटिक, प्रकाश पवार, जहांगीर शेख, राहुल जाधव, रितिक गुरुचल, लकी पवार,पंकज सपकाळे, संदीप निकम, अजय इंगळे, मुक्तार अली   आदी उपस्थित होते.

 

https://www.facebook.com/508992935887325/videos/699649414261093

 

Protected Content