Home Cities अमळनेर अमळनेर येथे दोन कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण

अमळनेर येथे दोन कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण

0
21


जळगाव प्रतिनिधी । येथील कोविड रूग्णालयात दाखल करण्यात आलेल्या रूग्णांमध्ये आज अजून दोन रूग्णांचा कोरोना चाचणी रिपोर्ट पॉझिटीव्ह आला असून हे दोन्ही अमळनेर मधील आहेत.

जिल्हा प्रशासनातर्फे आज एका निवेदनाच्या माध्यमातून दोन कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण असल्याची माहिती जाहीर करण्यात आली आहे. यात म्हटले आहे की, येथील कोविड रुग्णालयात कोरोना संशयित व्यक्तींचे स्वॅब घेतलेल्यांपैकी दोन रुग्णांचे अहवाल प्राप्त झाले आहे. या दोन रुग्णांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहे. दोन्ही कोरोना बाधित रूग्ण हे अमळनेर येथील असून यात एका 17 वर्षीय तरूणाचा तर एका 44 वर्षाच्या पुरूषाचा समावेश असून हे दोन्ही रूग्ण यापूर्वी आढळून आलेल्या कोरोना बाधित रूग्णाच्या संपर्कातील आहे.

जिल्ह्यात कोरोना बाधित रूग्णांची संख्या सोळा झाली असून यापैकी एक रूग्ण कोरोना मुक्त झाला आहे. चार रूग्णांचा मृत्यू झाला असून उर्वरित रूग्णांवर कोरोना संसर्ग कक्षात उपचार सुरू आहे. अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे.

यानंतर प्रशासनाने अर्ध्या तासाने सुधारित वृत्त टाकले असून ते आपण येथे क्लिक करून वाचू शकतात.आपण येथे क्लिक करून वाचू शकतात. यात जिल्ह्यात चार नवीन पॉझिटीव्ह रूग्ण आढळून आले असून यातील तिघे अमळनेरचे तर एक भुसावळ येतील असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. यामुळे जिल्ह्यातील पॉझिटीव्ह रूग्ण संख्या १८ इतकी झाली आहे.


Protected Content

Play sound