अमळनेर – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | खा.शि.मंडळाच्या जी.एस.हायस्कूल येथे “श्रीकृष्ण जयंती उत्सव” बाळ-गोपाळ मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी मोहनिश राजपूत हा कृष्णाच्या रुपात सजला होता त्याची सजावट शाळेतील शिक्षक अमित पाटील यांनी केली.
कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण दहीहंडीचे होते. उपस्थितांच्या उत्साहाला पार नव्हता, संगीतमय वातावरणात नृत्याचा ठेका धरीत दहीहंडी फोडण्यात आली.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक डी. एच. ठाकुर, ज्येष्ठ शिक्षक के. पी. पाटील, के.एस. गायकवाड, उमाकांत हिरे, पी.डी पवार, राहुल बहिरम तसेच सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली.