अमळनेर तालुक्यात बळीराजा महोत्सवाचा शुभारंभ  

 

अमळनेर – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी| तालुक्यातील मुडी प्रगणे डांगरी येथे नुकताच बळीराजा महोत्सवाचा शुभारंभ करण्यात आला याप्रसंगी अमळनेर तालुक्याचे माजी आमदार कृषी भूषण साहेबराव धोंडू पाटील यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले.

शिवव्याख्याते प्राध्यापक लीलाधर पाटील यांनी सम्राट बळीराजा यांचा जीवनपट आपल्या अमोघवाणीने साकार केला याप्रसंगी बळीराजा आग ऍग्रो समूहाचे संचालक माननीय किरण सूर्यवंशी तसेच जयवंतराव पाटील आणि संभाजी ब्रिगेड उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष श्यामकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा उत्साहात संपन्न झाला.

याप्रसंगी मुडी परिसरातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या समाजसेवकांचा सम्राट बळीराजा सन्मान 2022 23 अंतर्गत पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. यावेळी नवरात्र उत्सवा दरम्यान एका आदिवासी महिलेचे प्राण आणि तिच्या बाळाला जीवदान देणाऱ्या आरोग्य कर्मचारी सुनीता सैंदाणे यांना सर्वात कष्ट आरोग्य सेवा प्रदान केल्याबद्दल तसेच शासनाच्या विविध कल्याणकारी योजना गोरगरिबांपर्यंत तसेच आर्थिक दुर्बल घटकातील लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्या कामी महत्त्वपूर्ण योगदान देण्यासाठी त्यांना सम्राट बळीराजा आरोग्य सेवा सन्मान हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

हा सन्मान सोहळा समाजातील गोरगरीब तसेच वंचित घटकांच्या उन्नतीसाठी निरलस पणे कार्य करणाऱ्या व्यक्तींसाठी बळीराजा ऍग्रो समूह यांच्यामार्फत या पुरस्कार सोहळ्याचे दरवर्षी आयोजन करण्यात येते.

हा सन्मान सोहळा संभाजी ब्रिगेड अमळनेर तालुका अध्यक्ष किरण नानासाहेब सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाने पार पडला या सन्मान सोहळा यशस्वी होण्याकरिता माननीय नानासाहेब सूर्यवंशी माजी सरपंच मुडी तसेच प्राचार्य डॉक्टर ज्ञानेश्वर सूर्यवंशी व प्राध्यापक लीलाधर पाटील, शामकांत पाटील, गुणवंत पाटील, महेंद्र पाटील, संजीव पाटील, प्रफुल वानखेडे, प्रभाकर सूर्यवंशी, राजेंद्र सूर्यवंशी, जयेश सूर्यवंशी, श्रीयुत बोरसे यांचे अनमोल सहकार्य लाभले..

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजीव पाटील तसेच तुषार भाऊ सैंदाणे यांनी केले तर आभार प्रदर्शन किरण कुमार सूर्यवंशी यांनी केले बळीराजा उद्योग समूह आणि ऍग्रो एजन्सीच्या माध्यमातून दरवर्षी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या समाजसेवकांचा सन्मान सोहळा असाच दिमाखदार पद्धतीने महात्मा बळीराजा जयंतीदिनी साजरा केला जाईल असे प्रतिपादन कृषी भूषण साहेबराव धोंडू पाटील यांनी नमूद केले. याप्रसंगी प्राचार्य डॉक्टर ज्ञानेश्वर सूर्यवंशी लिखित गावांजली या काव्यसंग्रहाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी गौरव सूर्यवंशी प्रणव सोनवणे प्रमोद सोनवणे शांतीलाल सूर्यवंशी गुणवंत पाटील इत्यादी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर सूर्यवंशी यांनी केले.

माजी आमदार साहेबराव पाटील यांचे अध्यक्ष भाषणाने कार्यक्रमाचे सांगता करण्यात आली सर्व पुरस्कार प्राप्त व्यक्तींना पुढील समाज उपयोगी कार्य करण्यास आई महालक्ष्मी उदंड आयुष्य देवो अशी माते चरणी प्रार्थना करण्यात आली शिवव्याख्याते प्राध्यापक लीलाधर पाटील यांच्या सम्राट बळीराजा यांच्या जीवनावरील व्याख्यानाचा लाभ परिसरातील बहुसंख्य नागरिकांनी घेतला इडा पिडा तडो बळीच राज्य येऊ अशी अर्त हाक देण्यात आली.

Protected Content