अमळनेर तालुका व शहर रा.कॉ. महिला आघाडी पदाधिकारी नियुक्त

अमळनेर प्रतिनिधी । राष्ट्रवादी काँग्रेस नेत्या खा.सुप्रिया सुळे यांच्या आदेशानुसार आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते व राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी जिल्हाध्यक्षा वंदना चौधरी यांच्या उपस्थितीत महिला आघाडी कार्यकारणी पदाधिकारी घोषित करण्यात येऊन त्यांना नियुक्ती पत्र देऊन भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

गाव तेथे राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी शाखा  हा संकल्प व निश्चय ठेऊन राष्ट्रवादी पक्षप्रमुख  शरद पवार यांचे विचार गावागावात पोहचवुन सर्वसामान्य नागरीकांच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी महिला आघाडी पदाधिकारी यांनी कार्य करावे असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस नेते आमदार पाटील यांनी केले.

 

 

या महिला पदाधिकारी यांची झाली नियुक्ती

मंदाकिनी अनिल पाटील (तालुकाध्यक्षा), आशाताई अनिल शिंदे (कार्याध्यक्षा), प्राजक्ता मृणाल पवार (उपाध्यक्षा), अलका उत्कर्ष पवार (शहर अध्यक्षा), प्रेरणाताई बोरसे (विधानसभा क्षेत्र प्रमुख) यांची नियुक्ती करण्यात आली.तसेच कविता जितेंद्र पवार (जिल्हा उपाध्यक्षा), योजनताई पाटील व आशाताई चावरिया यांची (जिल्हा कार्यकारणी सदस्य) म्हणून नेमणूक करण्यात आली. कायम निमंत्रित महिला सदस्यांमध्ये जि.प.सदस्या जयश्री पाटील, बाजार समितीच्या मुख्य प्रशासक तिलोत्तमा पाटील, नाशिक जिल्ह्याच्या निरीक्षक रंजना देशमुख, ग्रंथालय विभागाच्या रिता बाविस्कर यांना स्थान देण्यात आलेले आहे.कार्यक्रमासाठी महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Protected Content