अमळनेर एसटी आगार प्रमुखांच्या विरोधात कर्मचार्‍यांचे चक्का जाम आंदोलन

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथील बस स्थानकातील कर्मचार्‍यांनी आगार प्रमुख इम्रान पठाण यांच्या मनमानी कारभार व उद्धट वागणुकीच्या विरोधात केले तीव्र आंदोलन करीत सुमारे दोन ते तीन तास चक्का जाम आंदोलन केले. यामुळे प्रवाशांची गैरसोय झाली.

 

अमळनेर आगराचे  बस स्थानक आगार प्रमुख इम्रान पठाण यांच्या विरोधात (अमळनेर आगारातील जवळपास ३५० ते ४००)सर्वच एसटी कर्मचारी आज आक्रमक झालेले पहावयास मिळाले.आगार प्रमुख हे मनमानी व उध्दट कारभार करतात, रजेचा पगार सह पगाराच्या मूळ वेतनाच्या १०% टक्के पगार कपात करण्याच्या विरोधात काम बंद चे आंदोलन करीत जाब विचारण्यासाठी आगार प्रमुखाच्या कार्यालयात गेले.

 

दरम्यान सदर घटनेचे वृत्तांकन करायला गेलेल्या पत्रकारालाही आगार प्रमुख इम्रान पठाण यांनी अरेरावी करीत वृत्तांकन करण्यास मज्जाव करून मोबाईल हिसकावण्याच्या प्रयत्न केला व शिपायाला बोलवून पत्रकारांना कार्यालय बाहेर काढण्यास सांगितले.शिस्त आवेदन पद्धत च्या नावाखाली कर्मचार्‍यांची आगार प्रमुख पिळवणूक करतात,अवाजवी दंड आकारतात.अशा बर्‍याच तक्रारीचं पाढाच याठिकाणी वाचण्यात आला.बराच वेळ हा सर्व गोंधळ अमळनेर आगारात दुपारी सुरू होता.

 

आंदोलनाची घटना कळताच आमदार अनिल पाटील यांनी आंदोलन स्थळ गाठले, आंदोलनस्थळी येऊन कर्मचारी यांचे म्हणणे एकूण घेतले व याबाबत जिल्हा व्यवस्थापक यांच्याशी फोन द्वारे संपर्क साधून योग्य  कारवाई करून कर्मचार्‍यांना न्याय देण्यास सांगितले.त्यानंतर पुढे जाऊन काही ठराविक अंतराने एक-एक अशा बसेस सुरू झाल्यात.परंतु या तू-तू ,मै-मै चा मनस्ताप प्रवाशी बांधवाना चांगलाच सहन करावा लागला.

दरम्यान,असे उद्धट अधिकार्‍यावर सरकारने कडक कारवाई करावी व कर्मचार्‍यांवर नियमबाह्य केलेल्या कारवाई मागे घ्यावे,अशी मागणी कर्मचार्यांनी केली आहे.

Protected Content