अमळनेर प्रतिनिधी । शहरातील जी.एस. हायस्कूल येथील एका सेवानिवृत्त शिक्षकाच्या घरातून सोन्याचे दागीने आणि रोकड असा एकुण ३६ हजार रूपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याचे उघडकीला आले आहे. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की, राजेंद्र कन्हैयालाल नांदोडे (वय-६०) रा. अनुराधा अपार्टमेंट जी.एस.हायस्कूल अमळनेर हे सेवानिवृत्त शिक्षक आहेत. २६ जुलै रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास घरात कोणीही नसतांना अनोळखी व्यक्तीने घरात घुसून घरातील सोन्याचे दागीने व चांदीचे कॉईन तसचे ५ हजाराची रोकड असा एकुण ३६ हजार ५०० रूपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याचे उघडकीला आले आहे. याप्रकरणी राजेंद्र नांदोडे यांच्या फिर्यादीवरून अमळनेर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपस पोलीस नाईक सचिन पाटील करीत आहे.