Home Cities अमळनेर अमळनेरात वृध्द महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत लांबविली

अमळनेरात वृध्द महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत लांबविली


अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातून पायी जाणाऱ्या वृद्ध महिलेच्या गळ्यातील गळ्यातील १५ हजार रुपये किमतीची सोन्याची पोत अज्ञात दोन जणांनी चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. या संदर्भात सोमवार १० एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, अंजवाबाई साहेबराव पाटील (वय-७७) रा.पिंपळे खुर्द ता.अमळनेर या वयोवृद्ध महिला सोमवार १० एप्रिल रोजी शहरातील राणे झेरॉक्स दुकानाच्या गल्लीतून पायी जात होत्या. त्यावेळी अज्ञात दोन जणांनी त्यांच्याजवळ येऊन गळ्यातील सोन्याची पोत दाखवा असे सांगून त्यांच्या गळ्यातील १५ हजार रुपये किमतीची सोन्याची पोत चोरून नेली. या संदर्भात वृद्ध महिलेने अमळनेर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात दोन भामट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल सुनील हटकर करीत आहे.


Protected Content

Play sound