Home Cities अमळनेर अमळनेरात विवाहितेवर अत्याचार; दोघांवर गुन्हा

अमळनेरात विवाहितेवर अत्याचार; दोघांवर गुन्हा


अमळनेर प्रतिनिधी । फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत महिलेवर अत्याचार करणाऱ्या दोघांवर अमळनेर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

शहरातील ४५ वषीय महिलेला गावाती संशयित आरोपी महेंद्र वसंत चौधरी याने ६ मार्च रोजी महिलेकडे पाहून अश्लिल इशारे करून माझ्याशी शारिरीक संबंध ठेव अन्यथा तुझे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करेल अशी धमकी देवून महिलेच्या घरात घुसून अत्याचार केला. तर संशयित आरोपी महेंद्र चौधरी यांची पत्नी ज्योती चौधरी हिने काठी घेवून बाहेर जाण्यापासून रोखले. व जीवे ठार मारण्याची धमकी दिली. पिडीत महिलेच्या फिर्यादीवरून अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनी परदेशी करीत आहे.

 


Protected Content

Play sound