अमळनेर, प्रतिनिधी | लोक संघर्ष मोर्चाच्या राष्ट्रीय नेत्या प्रतिभाताई शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली लोक संघर्ष मोर्चा, मुस्लिम युथ सेवा फाऊंडेशन व हजरत बाबा ताज फाऊंडेशन आयोजित महालसीकरण अभिमान राबविण्यात आले.
अमळनेर सैयदी हॉलजवळ महालासीकरण अभियानात गांधलीपुरा, दर्गाहअली मोहल्ला, कादरी गल्ली येथील सर्वाधीक महिला, पुरूषांसह तर २५० मुस्लिम महिलांनी लसीकरणाचा लाभ घेतला. कार्यक्रमाचे अध्यक्ष नगरपालिका रूग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. विलास महाजन व प्रमुख पाहुणे डॉ. रूपेश संचेती, लोक संघर्ष मोर्चाचे पन्नालाल मावळे, हमीद जनाब, ॶॅड शकिल काझी हे होते.
लसीकरणाचा शुभारंभ मुस्लिम युथ सेवा फाऊंडेशन चे अध्यक्ष रियाज़ शेख व लोक संघर्ष मोर्चाचे नेते संजु पवार प्रथम यांचे लसीकरण करून लसीकरण अभियानास प्रारंभ करण्यात आला. गांधलीपुरा, दर्गाहअली मोहल्ला,कादरी गल्ली या भागात आयोजक सह स्थानिक नगरसेवक, पदाधिकारी यांनी रॅली काढून लसीचे महत्त्व पटवून दिले. यावेळी लसीबाबतचा असलेला गैरसमज हि काढण्यात आला. डॉ. विलास महाजन व रियाज़ शेख यांनी मनोगत व्यक्त केले, सुत्रसंचालन ॶॅड रज्जाक शेख यांनी केले तर वैद्यकीय अधिकारी डॉ. विलास महाजन सह वैद्यकीय टिम चे आभार पन्नालाल मावळे यांनी मानले. लसीकरणाच आयोजन व यशस्वी करिता मुस्लिम युथ सेवा फाऊंडेशन व हजरत बाबा ताज फाऊंडेशन चे अध्यक्ष रियाज़ शेख, सह लोक संघर्ष मोर्चा विभागीय संघटक पन्नालाल मावळे, नगरसेवक संजुभाऊ पवार, ॶॅड. रज्जाक शेख, नगरसेवक सलीम टोपी, आबिद मिस्तरी, बालीक पवार, संतोष भाऊ लोहरे (डमरु भैया) हमीद जनाब, हाजी मुज्जफर, भावी नगरसेवक कालीम भाई, अख्तर अली, इकबाल कुरेशी, सुलतान भाई, पप्पु कलोशे, हाशम मिस्तरी, रईस शेख, कुदरत अली, शरफत मिस्तरी, मुस्तफा भाई, अहतेशम भाई, अमजद अली शाहा, मुकेश अंबानी साहेब, नितीन भाऊ, धनराज पारधी, जय पारधी, करण पारधी, आप्पा साहेब पारधी,साहेबराव पारधी, कारी मोहतीशीम, इश्कियाक भाई, निखिल बोरसे, नुरा मिस्तरी, कलाभाई प्लंबर, जाकीर शेख, अ खालीक अहलेकार सह आदि मान्यवरांनी उपस्थित राहून महालसीकरण अभियान राबविण्यात आले.